nav-left cat-right
cat-right

मुंबई आर्ट फेअरच्या तिसऱ्या पर्वात ३५० कलाकार सादर करणार ‘मूर्त -अमूर्तकला संगम’

मुंबई आर्ट फेअरच्या तिसऱ्या  पर्वात ३५० कलाकार सादर करणार ‘मूर्त -अमूर्तकला संगम’

मुंबई आर्ट फेअरच्या तिसऱ्या पर्वात ३५० कलाकार सादर करणार ‘मूर्त -अमूर्तकला संगम’

  • देशभरातील चित्रांचा रंगोत्सव
  • २८ ते ३० ऑक्टोबरदम्यान नेहरू सेंटर येथे

मुंबई २०२२ : मुंबई हे देशातील सांस्कृतिक केंद्र असून कला महोत्सव, कला दालने, वस्तुसंग्रहालये हे या शहरातील जीवनशैलीचा अविभाज्य घटक आहेत. मुंबईत कला महोत्सव  कोरोना पूर्व काळापासून  लोकप्रिय असून या माध्यमातून उदयोन्मुख कालाकारांना प्रसिद्धी मिळते आणि त्यांना या क्षेत्रातील प्रस्थापितांसोबत एकाच व्यासपीठावर आपली कला सादर करण्याची संधी मिळते. मुंबई आर्ट फेअरच्या तिसऱ्या  पर्वात ‘‘मूर्त -अमूर्तकला संगम’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित कला प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये प्रस्थापित कलाकारांपासून ते उदयोन्मुख कलाकारांपर्यंत, वय किंवा पात्रतेचे कोणतेही बंधन न ठेवता आणि लडाख ते कन्याकुमारीपर्यंतच्या कलाकारांच्याकलाकृती या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. या वर्षीच्या रंगोत्सवात ३५० कलाकार एकत्र येणार आहेत आणि देशभरातील वैविध्यपूर्ण चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. निसर्गचित्रे, व्यक्तीचित्रे, अॅबस्ट्रॅक्ट, वास्तवदर्शी चित्रे, शहरचित्रे, धार्मिक चित्रांपासून ते वैयक्तिक अनुभूतींपर्यंत विविध शैली व विषयांवरील चित्रे त्यांच्यात सखोल दडलेल्या अर्थासह येथे पाहता येणार आहेत. नेहरू सेंटरमध्ये २८ ते  ३० ऑक्टोबरदरम्यान हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

या वर्षीच्या मुंबई आर्ट फेअरमध्ये वैविध्यपूर्ण कला, विविध प्रकारची माध्यमे, शैली आणि विषय समाविष्ट असून चोखंदळ कलासंग्राहकांना या कलकृती निश्चित पसंत पडतील. मुंबई आर्ट फेअरचे संचालक राजेंद्र पाटील  म्हणतात, “मुंबई आर्ट फेअरमध्ये अप्रतिम चित्रे आणि शिल्पांसोबत इतही अनेक कलाकृती पाहायला मिळतील आणि या महोत्सवामध्ये असलेली कलाकारांची उपस्थिती चोखंदळ प्रेक्षक, खरेदीदार आणि संग्राहकांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. अमूर्त कला शैलीचा उगम मुळातच निसर्ग चित्रांमध्ये दळलेला असून या ठिकाणी आपल्या काही अप्रीम अमूत शैलीतील चित्रे पाहता येतील जी निरखून  पाहिल्यास मूर्तस्वरूपातीलच  निसर्ग चित्रांचा आभास करणारी अशी आहेत ”

वास्तवाऐवजी भावना, संवेदना, कल्पना आणि विषयभावांवर भर देत विविध कलाकार आणि शैली एकत्रित आणणे हे मुंबई आर्ट फेअरच्या तिसऱ्या पर्वाचे उद्दिष्ट आहे. या कला प्रदर्शनात कलाकार अॅबस्ट्रॅक्ट कला, निसर्गचित्रे, वास्तवदर्शी चित्रे, बौद्ध धर्म इत्यादी विविध विषयांवरील कलाकृती सादर करणार आहेत. जल्पा पटेल, प्रकाश बाळ जोशी, अंजली प्रभाकर, नेहा ठाकरे, नीलिमा दानी, नीलेश उपाध्याय, पूनम खानविलकर, आर सोलोमन, राहत काजमी, यांच्यासारखे कलाकार मुंबई आर्ट फेअरमध्ये सहभाग होणार आहेत. चित्रांसोबतच डॉ. शंकर शर्मा, पूर्वी लोहाना , मीना राघवन आदी चित्रकारांनी घडविलेले भारतीय पारंपरिक कलांशी नाळ जुळलेल्या अशा कलाकृतीसुद्धा प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत. काही कला प्रशिक्षण संस्थासुद्धा या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. कलाशाखेच्या विद्यार्थ्यांना दृश्यकलेचे प्रशिक्षण देण्यासोबतच व्यावसायिक कलाविश्वात शाही प्रवेश देण्यासाठी ते मुंबई आर्ट फेअरमध्ये समूह प्रदर्शन भरविणार आहेत.

काय:  मुंबई आर्ट फेअर तिसरी आवृत्ती

कुठे: नेहरू सेंटर, वरळी

कधी: २८ – ३० ऑक्टोबर २०२२

प्रवेश मोफत

——–Naarad PR and Image Strategists

Dr. Anusha Srinivasan Iyer: 9820535230.

Siddhant Gill: 9833775230.

      

मुंबई आर्ट फेअरच्या तिसऱ्या  पर्वात ३५० कलाकार सादर करणार ‘मूर्त -अमूर्तकला संगम’

 

Print Friendly, PDF & Email

Comments are closed.